जळगाव (प्रतिनिधी) अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून प्रत्येकाचे योगदान मिळावे यासाठी निधी संकलन केले जात आहे. मंगळवारी शहरात आयोजित निधी संकलन रॅलीचे महापौरांच्या घराजवळ महाराणा प्रताप चौकात महापौर भारती सोनवणे यांनी फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले.
प्रभू श्रीराम प्रेमी भक्तांकडून निधी संकलनासाठी मंगळवारी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी रॅली महाराणा प्रताप चौकात आली असता महापौर भारती सोनवणे यांनी रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह महापौरांचे कुटुंबीय आणि परिसरातील हिंदू-मुस्लीम नागरिक उपस्थित होते.
रॅलीवर फुलांची मुक्त उधळण
रॅलीचे आगमन होताच दोन्ही बाजूने फुलांची उधळण करण्यात आली. सर्व श्रीराम प्रेमी भक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत होता.