जळगाव(प्रतिनिधी) : उर्दू घर अस्थायी समिती गठीत झाल्यावर शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची समितीने भेट घेऊन त्यांना उर्दू घर जागेसाठी ४ जागेचा प्रस्ताव दिला होता त्या अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर प्रकरणी जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप राव पाटील यांना उर्दू घरच्या जागेसाठी आवश्यक तो पत्रव्यवहार करण्याच्या लिखित सूचना केल्या होत्या.
त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांची उर्दू घर समितीच्या सदस्यांनी पाठपुरावांतर्गत भेट घेऊ चर्चा केली
उर्दू घरच्या जागेसाठी जिल्हाधिकारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कुलगुरू यांना पत्र देऊन आपल्या परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करणारे पत्र सादर करण्याच्या सूचना असल्याने त्या पत्रव्यवहाराची व निधी उपलब्धते बाबत ची माहिती प्रताप राव पाटील यांनी या समिती सदस्यांना दिली.
कामा साठी पाठपुरा आवश्यक – पाटील
शासकीय अथवा इतर कामासाठी आवश्यक तो पाठपुरावा केल्यास ते काम लवकरात लवकर पूर्ण होत असते व आपण समिती पाठपुरावांतर्गत जे कार्य करीत आहे ते कौतुकास पात्र असल्याचे सुद्धा प्रतापराव पाटील यांनी चर्चेत विशद केले.
त्यांनी सुद्धा आपल्या कार्यलयीन कामाची तत्परता दाखवत समितीचे निवेदनावर असलेले जिल्हा अधिकारी यांचे आदेश प्राप्त केले. त्यावर लागलीच टिपण तयार करून पत्राचे ड्राफ्ट सुध्दा तयार करून जिल्हाअधिकारी यांचे स्वाक्षरी साठी सादर केले.
पाटील यांनी आपल्यातील खिलाडी वृत्तीचे दर्शन या वेळी समिती सदस्यांना घडविले. कारण प्रतापराव पाटील हे उत्कृष्ट सायकलपटू असून ते दररोज ४० ते ५० किमी सराव करतात. समितीचे समन्वयक फारुक शेख सह सईद पटेल, मजहर पठाण, अनवरखान ,बाबा देशमुख, अक्रम देशमुख, कासिम उमर आदींची उपस्थिती होती.
















