अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू महिला सन २०२१ चा पुरस्कार अमळनेर च्या सायली किरण बडगुजरला १ मे रोजी जळगाव पोलिस मैदानावर जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व १० हजार रुपयांचा चेक देण्यात आला.
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व नाशिक बोर्डाचे माजी सदस्य प्रकाश पाटील, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी सायली बडगुजरचा व तिच्या आई-वडिलांचा शाल, बुके, पेन देऊन सत्कार केला. तिच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.