अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात मंत्री अनिल भाईदास पाटलांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कारण शेवटच्या दिवशी अनिल भाईदास पाटील नामक अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव, जळगाव ग्रामीण नंतर आता अमळनेरातही नाव साधर्म्य असणाऱ्या उमेदवारामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. अमळनेरात मंत्री अनिल भाईदास पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी एक मोठी खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे. शेवटच्या दिवशी अनिल भाईदास पाटील नामक अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाव साधर्म्य असणारा अपक्ष उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतो की, माघार घेतो, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा मतदार संघासाठी अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर ३० रोजी सकाळी ११ वाजेला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे अनिल भाईदास पाटील, जयश्री अनिल पाटील या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे डॉ. अनिल नथ्थु शिंदे, अपक्ष म्हणून शिरीष हिरालाल चौधरी, प्रथमेश शिरीष चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे.