धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये नुकताच अल्पसंख्यांक हक्क दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी १८ डिसेंबर हा ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्याक लोकांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिन का साजरा केला जातो. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि जैन हे भारतातील अल्पसंख्याक मानले जातात. यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ म्हणजे १८ डिसेंबर रोजी देशात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जातो. भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले पाहिजेत. पण कोणतीही जात, धर्म, भाषा किंवा समुदाय. देशाच्या घटनेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती हे संयुक्त राष्ट्राने उचललेले हे मोठे पाऊल होते. विशेषतः भारताच्या दृष्टिकोनातून हे लक्षात घेऊन भारतात अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली. हा आयोग अल्पसंख्याक लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलतो आणि बहुसंख्य लोकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो, अशी विस्तृत माहिती श्री.वाघ यांनी आपल्या मनोगतातून सांगितली. तसेच, शाळेची विद्यार्थिनी कु.सोनाली पाटील, कु.हर्षदा महाजन, कु.कोमल भोई, कु. अंकिता पाटील यांनीही अल्पसंख्याक दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस.पवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हक्क – अधिकाराची माहिती दिली. अल्पसंख्यांक समुदायाचे मोठे योगदान आहे. सर्वधर्म समभाव, समता एकात्मता, बंधुता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे ते सर्वांनी जोपासावे. याप्रसंगी पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के. कापडणे, सी.एम.भोळे, एस.एन.कोळी, एस.व्ही.आढावे, व्ही.टी.माळी, श्रीमती.व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे महाजन व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एच.डी.माळी यांनी तर आभार पी.डी.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.