TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चषक “ राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व !

ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे भव्य राज्यस्तरीय तायक्वोंडो आमदार चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2024
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) उच्य व तांत्रिक शिक्षण मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे महाळुगे, बालेवाडी क्रीडा नगरी मध्ये भव्य आमदार चषक राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्य स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर व मुंबई जिल्ह्याचे वर्चस्व राहिले.

बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या मान्यतेने फायटर्स तायक्वांदो अकॅडमी, पुणे आयोजित ३३ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा अतिशय उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमधून ७५० हून अधिक खेळाडूंनी क्योरोगी व पूमसे या दोन प्रकारात स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुलांमध्ये कृष्णा डोलारकर ( परभणी) व मुलींमध्ये राधिका भोसले (ठाणे) हे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले. “ क्योरोगी“ प्रकारामध्ये ठाणे जिल्ह्याने सर्वाधिक पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला असून पुणे जिल्हा द्वितीय तर कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर राहिला. ” पूमसे“ प्रकारात रत्नागिरी, ठाणे व पालघर संघाचे वर्चस्व राहिले. एकमेव अधिकृत असलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुंबई या राज्य संघटनेच्या खेळाडुंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून आडकाठी आणली आहे. पात्र खेळाडूंना हक्काच्या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अश्या वागणुकीमुळे प्रतिभावान खेळाडुंचे टॅलेंट वाया जाईल. या गोष्टीला वेळीच आवर घाला, अशी मागणी करत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ॲड आर डी मंगुयेशकर यांनी महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका अशी साद घातली आहे. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. उच्च व तंञ शिक्षणमंञी चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून या ‘आमदार चषका’चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले. छतीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रदर्शन चांगले होईल असेही ते म्हणाले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

शिवछञपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रविण बोरसे यांच्या फायटर्स अकॅडेमी कडून आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडुंचा सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “ ताम “ तायक्वांदो संघटनेकडून खेळातील उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार २०२३ ने अमोल तोडनकर ( क्योरोगी ) व रॅाबीन वॉल्टर (पूमसे ) यांना तर गुणवंत वरिष्ठ संघ प्रशिक्षक म्हणून प्रविण सोंकुल यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार २०२३ साठी अभिजित खोपडे, निशिता कोतवाल ( क्योरोगी ) व वंश ठाकूर, मृणाली हार्नेकर (पूमसे ) यांना पुरस्काराने सन्मानित केले तर तायक्वांदो खेळातील सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो संघटनेचा राज्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या स्पर्धा दि १८, १९ व २० जानेवारी २०२४ दरम्यान पुणे येथे पार पडली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे यांनी पुणे विद्यापीठामध्ये हा खेळ समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिले व आयोजकांना तशी पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी व्यासपीठावर दक्षिण कोथरूड मंडलाचे अध्यक्ष डॅा. संदिप बुटाला, उत्तम अध्यक्ष मंडलाचे मा. श्री. सचिन पाषाणकर, मंडल सरचिटणीस व स्पर्धा प्रमुख प्रा.अनुराधा येडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, मा. नगरसेवक श्री.दिलीप वेडे पाटील, वृक्षालीताई चौधरी, श्री. दत्ताभाऊ चौधरी, श्री. लहू बालवडकर, श्री. हेमंत बोरकर, तायक्वांदो फेडरेशनचे सहसचिव मा. श्री.मिलिंद पठारे, तायक्वांदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्री. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री. धुलिचंद मेश्राम, श्री. प्रविण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सहसचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री. व्यंकटेश कर्रा, सदस्य श्री. अजित घारगे, श्री. निरज बोरसे, सहयोगी पदाधिकारी श्री.राजेश महाजन, श्री.भालचंद्र कुलकर्णी, श्री. विनायक ऐनापुरे, श्री. विजय कांबळे आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. भगतसिंग वेलानी व आयोजन समितीचे सचिव श्री.विवेक कोळी यांची उपस्थिती लाभली. समालोचन सौ प्राजक्ता मांडके यांनी केले तर डॉ. अविनाश बारगजे यांनी आभार मानले.

तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका : अॅड. मंगूयेशकर !

तायक्वांदो खेळात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. तायक्वांदो खेळातील सर्वच स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ही गुणवता खेळातील आलेल्या एमओए च्या राजकारणामुळे वाया जाईल कि काय अशी भिती आहे. महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका, अशी साद तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव ऍड. आर डी मंगूयेशकर यांनी ३३ वी महाराष्ट्र राज्य सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राज्य सरकार ला घातली आहे

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

ब्रेकिंग : लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार?, पत्र व्हायरल ; निवडणूक आयोग म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १९ कोरोनाबाधित, ५३ झाले बरे !

July 19, 2021

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

October 2, 2020

जिल्हा प्रशासनातर्फे संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group