चोपडा(प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते नवनिर्वाचित आमदार प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा ऋण प्रकट दौरा चोपडा व यावल तालुक्यातून होत असून प्रथमच मतांची उतराई म्हणून जनतेच्या दरबारात हात जोडून आभार मानणारे एकमेव आमदार पाहावयास मिळणार आहेत. राज्यभरात अनेक आमदार विजया नंतर जनतेकडे ढूंकुनही पाहत नाही मात्र चोपडा मतदारसंघात उलट चित्र पाहावयास मिळत असून माणूसकीचा ठेवा जपणारे नेतृत्व लाभल्याचा प्रत्यय मतदार राजाला जाणवणार आहे.
दि.२८/११/२०२४ रोजी १७ गावांचा दौरा केला असून निवडण्याआधी आ.श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्येक गावात मतांसाठी मतदार राज्याच्या दारात जाऊन विनंती करून मतदान करण्याचे आवाहन केले होते.त्या विनंतीस पसंती देऊन जनतेने आपणास प्रचंड मतांनी निवडून आमदारकीची खुर्ची बहाल केली म्हणून त्यांचे प्रत्यक्ष आभार मानने आपले आद्य कर्तव्य असल्याची जाण ठेवून जनता दरबारात जाऊन आभार दौरा करण्याची खूणगाठ मनाशी बांधून ते आभार प्रकट दौरा प्रारंभ करीत आहेत.
आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे हे उद्या पुढील गावात जाऊन त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहे.पुनगांव,देवगांव ,धानोरा,मोहरद, बीडगांव, कुंड्यापाणी वरगव्हाण,शेवरे बु. खर्डी, लोणी, पंचक पारगांव ,चांदसणी, कमळगाव, पिंप्री, मितावली,रुखनखेडा(प्र. अ.)अडावद, तरी वरील ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजर राहून प्रेम वृध्दिंगत करावे अशी विनंती आमदार कार्यालयामार्फत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.मतदारांनी दिलेल्या प्रचंड बहुमतांमुळेच हे शक्य झाले असून चोपडा-यावल तालुक्याचा विकास रथ हाकण्याची पुन्हा संधी दिल्याने मी आपल्या सेवेसाठी सदैव बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दौरा प्रारंभ पूर्वी बोलतांना दिली आहे.