मुंबई (वृत्तसंस्था) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हातावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नव्हते. राज ठाकरेंना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळं ते बैठकीला उपस्थित राहु शकलेले नाहीत. त्यांच्या हातावर आज शस्त्रक्रिया होत आहे.