चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि १८ मार्च २०२२ रोजी रात्री ००.१२ वा. सुमारास मुलीच्या घरातील बैठक रूममध्ये आजी आजोबा व लहान बहीण असे झोपले असतांना अल्पवयीनमुलाने अनाधिकृतपणे घरात प्रवेश करुन मुलगी झोपली असतांना तिच्या अंगावरील पाघरुन काढुन वाईट उद्देशाने उजव्या हाताचे मनगट धरुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.