यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवतीला व्हॅट्सअॅपवर वारंवार मेसेज पाठवून त्रास देत विनयभंग करणाऱ्याविरुद्ध अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवतीला ९५२९०२२५८५ या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने सतत व्हॅट्सॲवर मेसेज करून त्रास देत होता. याबाबत युवतीने विचारणा करताच अज्ञात व्यक्तीने तिला अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.