नाशिक (वृत्तसंस्था) विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत महिलेने आयुष्याची अखेर केली. ”आई मला माफ कर” अशी चिठ्ठी (Suicide Note) आईच्या नावे लिहित महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियंका आकाश पगारे (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवड नगर) असे या विवाहित महिलेचे नाव होते. सकाळी साडेदहाच्या वाजेच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु तिच्याकडे पोलीसांना सुसाइड नोट सापडली आहे. घटनास्थळावरून तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉ. धूम यांनी तपासून मृत घोषित केले.
आईच्या नावे सुसाईड नोट
सुसाइड नोटमध्ये तिने वडिलांना उद्देशून म्हटलं की, मी गेल्यावर थोडा त्रास होईल पण नंतर सर्व ठीक होईल. तसेच आई मला माफ कर, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. असे लिहिले असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पाेलिस करत आहेत.