TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सव आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड(प्रतिनिधी) : बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ग्रो ग्रीन क्लब अंतर्गत पावसाळी रानभाजी महोत्सव शुक्रवार 2 रोजी आयोजित करण्यात आला.महोत्सवाचे उदघाटन जामनेर येथील रस्सा भाकर हॉटेलचे संचालक संकेत पाटील यांनी केले. रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करतात तसेच नैसर्गिक वातावरणात उगवलेल्या रानभाज्या अनेक विकारांवर उपयुक्त आहेत.

घरच्या मसाल्यांचा वापर करून केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात असे उदघाटक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रमुख पाहुण्या जामनेर महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मंदा पाटील या होत्या. त्यांनी रानभाज्या सेवन हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे असे सांगत त्याचा वापर आपण अवश्य करायला हवा असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी रानभाज्याची ओळख व त्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे याची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी अश्या महोत्सवाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात परिसरातील रानभाज्या यांची ओळख ,त्यांचे गुणधर्मामुळे त्यांचे उपयोग व दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचे संवर्धन होण्यासाठी जागृती हा उद्देश महोत्सवाचा असल्याचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ गीता पाटील यांनी नमूद केले.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .यावेळी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कुरडू, मायाळू, घोळ, कटूरले, अंबाडी, लाल माठ, तांदुळजा, केना,फांग, अळू, शेवगा, इत्यादी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृती सादर केल्या.या वेळी उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी, नारायण अकॅडमीचे संचालक प्रा. अमरीश चौधरी, प्राध्यापक प्रभाकर महाले. डॉ. अजय पाटील. हेमलता कोटेचा, डॉ. ईश्वर म्हसलेकर, प्रा. नितेश सावदेकर ,डॉ. रुपेश मोरे,डॉ. अनिल बारी, यांच्यासह महोत्सवास भेट देणाऱ्यांनी पाककृतींची चव घेतली.बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण प्राध्यापक मंदा पाटील,श्री. संकेत पाटील व डॉ. रत्ना जवरास यांनी केले.प्रथम क्रमांक कु.ऐश्वर्या शेळके हिने तर द्वितीय क्रमांक कु. करिष्मा तेली व गोपाल तेली ह्यांनी आणि कु. कोमल लोहार व प्रीती पाटील ह्यांनी तृतीय क्रमांक पटकावला .प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वंदना नांदवे यांनी केले तर आभार .संदीप बरडे यांनी मानले.महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ,कार्यालय अधिक्षक बाबुराव हिवराळे ,श्री. शेखार्सिंग चव्हाण, डॉ. मनोज निकाळजे ,डॉ. चेतन शर्मा, श्री. नरेंद्र जोशी, डॉ. रुपाली तायडे, कंचन दमाडे, वैशाली अहिरे, संदीप बर्डे,भूषण धनजे, समीर पाटील, जितेंद्र बडगुजर विजू धोबी ,अतुल पाटील, दीपक जोशी , नामदेव बडगुजर , वैभव माटे , ज्ञानेश्वर बाविस्कर , राम पाटील , अक्षय सुकाळे ,पवन गावंडे या सर्वांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

मुक्ताईनगरात आदिवासी वसतिगृहात कर्मचाऱ्याने घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 जून 2024 !

June 7, 2024

आमदार-खासदारांचे लाड आता बंद ; गाडीवर अशोकस्तंभ लावण्यास मनाई, अन्यथा थेट कारवाई

December 12, 2021

जळगावात शिक्षकांसाठीची नाट्य कार्यशाळा उत्साहात !

July 24, 2022

वेगवेगळ्या घटनेतील बालिकांवरील अत्याचाराच्या विरोधात पारधी समाज बांधवांचा धरणगावात मुक मोर्चा !

December 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group