TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात शिक्षकांसाठीची नाट्य कार्यशाळा उत्साहात !

बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा व महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक पाया घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये बालकांचे कलागुण विकसित करण्याचे सामर्थ्य यावे यासाठी राज्यात प्रथमच बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा निश्चितच उद्याचे यशस्वी कलावंत घडवेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमधील शिक्षकांसाठीच्या नाट्य कार्यशाळा उद्‌घाटन प्रसंगी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, बालकांतील अभिनय, नृत्य, संगीत या गुणांचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आधारभूत ठरणारे गुण आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला शैक्षणिक पैलू पाडतांना त्यांचा आयक्यू वाढवित असतांना त्यांच्या इक्यू म्हणजे इमोशन कोशंट वाढविण्यासाठी या कला सहाय्यभूत ठरत असतात. आज या कार्यशाळेच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या पायावर निश्चितच जळगावातील बालकलावंत पुढे जाऊन यशस्वी कलावंत ठरतील, असा मला विश्वास आहे.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

कार्यशाळेचे उद्‌घाटन दीपप्रज्वलन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाहीर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा प्रा.डॉ.शमा सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्यशाळेचे वक्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्‌घाटनानंतर नाट्यरंग थिएटर्स, जळगाव निर्मित अमोल ठाकूर लिखीत – दिग्दर्शित पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग करण्यात आला. मुलांच्या मनात असलेली वेगवेगळ्या विषयांची भीती, मिळणारे कमी गुण, अधिक गुणांसाठी असलेला पालकांचा आग्रह या विषयावर हसत खेळत भाष्य करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बालनाट्याच्या प्रयोगाला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या बालनाट्यात संस्कृती पवनीकर, मयंक ठाकूर, अंशा चव्हाण, शर्वा जोशी ,नेहा वंदना सुनिल, कृतिका कोरे, केतकी कोरे, कृष्णा पाटील, विकास वाघ, चंद्रकांत चौधरी, अमोल ठाकूर, अथर्व रंधे हे बालकलावंत तर तांत्रिक बाजू प्रकाश योजना – स्वप्निल गायकवाड, रंगभूषा व वेशभूषा – दिशा ठाकूर, पार्श्वसंगीत – दर्शन गुजराती, धनश्री जोशी, रंगमंच व्यवस्था – राहुल वंदना सुनील, ज्ञानेश्वर वाघ, सचिन महाजन, दीपक महाजन, रोहन चव्हाण यांनी सांभाळल्या होत्या.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी अनौपचारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सांस्कृतिक अंगांचा विकास करत एकूणच त्यांच्या व्यकिमत्वाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल यावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांमधील निरीक्षणशक्ती व कुतुहल निरनिराळ्या खेळांमधून कसे वाढवावे या विषयी – बालनाट्य आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे श्याम ठाकरे, कैलास तायडे, देवेंद्र चौधरी, गोविंदा लोखंडे, निलेश मोरे, राहुल चौधरी, निखिल जोगी, प्रतिक्षा पाटील, सुनिल पवार, कैलास थोरवे, गणेश लोडते, सैय्यद जाकिर अली, शेख जाकीर अहेमद, उमाकांत नाथबुवा, सोमनाथ लोखंडे, चंद्रकांत पाटील, विनोद शेलवडकर, केतन ब-हाटे यांनी परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

२६ व ३० जुलैला जळगाव जिल्ह्यात ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन !

October 20, 2024

जळगाव : गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

October 15, 2024

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका सहृदयी अधिकाऱ्याच्या मनाचा वेध घेणारे फिचर

May 2, 2024

उसतोड कामगारांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली ; १५ कामगार जखमी !

May 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group