नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज देशात प्राणघातक कोरोना (Corornavirus) साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता १४.५० टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ४ कोटी १० लाख ९२ हजार ५२२ झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख ८४ हजार ९३७ वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ९४ हजार ९१ झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तीन लाख ५२ हजार ७८४ लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख १३ हजार ४९४ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत १६५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६५ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात ६२ लाख २२ हजार ६८२ डोस देण्यात आले. देशभरात आतापर्यंत १६५ कोटी ७० लाख ६० हजार ६९२ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.