TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन : लक्ष्मणराव पाटील !

महापुरुषांचे खरे चरित्र जाणून घेणे काळाची गरज : दिलीप खोडपे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2023
in जामनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नेरी बु. येथील जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच उपस्थित अतिथी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य दिलीप खोडपे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणून धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. दामिनी कुमावत आणि खुशी कोळी या विद्यार्थिनींनी माईंच्या विषयीचे गीत अतिशय सुमधुर आवाजात सादर केलं. गायत्री भावसार या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून माईंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शाळेच्या माजी विद्यार्थी चेतन निंबाडे व त्यांच्या मित्र परिवाराला वडाचे झाड भेट दिले तसेच नेरी दिगर च्या केंद्रप्रमुख शुभांगीताई पाटील व शिक्षिका भगिनींना सवित्रीमाईंचे पुस्तक भेट स्वरूप दिले. सावित्रीमाई फुले यांचे जीवनकार्य, बालिका दिन, महिला मुक्ती दिन, स्त्री शिक्षण दिन याविषयी सविस्तर माहिती दिली. विविध उदाहरणे तसेच गोष्टींच्या माध्यमातून प्रबोधन करतांना व्याख्याते पाटील यांनी सांगितले की, महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करण्याचं श्रेय सर्वतोपरी सवित्रीमाईंनाच द्यावे लागेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप खोडपे सरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची स्तुती केली तसेच महापुरुषांचे चरित्र समजून घेणं काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फॉरेन्सिक युनिट जळगावचे योगेश वराडे, केंद्रप्रमुख शुभांगीताई पाटील, शा.व्य.स.अध्यक्ष रविंद्र भोई, शा.व्य.स.सदस्य पूजा पाटील, ग्रा.पं.सदस्य निशा तायडे, माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य भगवान इंगळे, ग्रा.पं.सदस्य सावित्राबाई भिल, मुख्याध्यापक मनोहर पाटील यांच्यासह शिवदास माळवे, कैलास गोसावी, श्रीमती देवांगणा काळे, संगीता पवार, स्नेहल कानडे, पुष्पा चौधरी हे शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेचा पालकवर्ग, गावातील महिला व पुरुष वर्ग हजर होते. शाळेच्या २१२ पटसंख्येपैकी ७२ मुले व ९१ मुली असे एकूण १६३ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या अतिशय देखण्या तथा वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी ग्रुप, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकवर्ग जि.प.शाळा नेरी बु.।। ता. जामनेर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी ग्रुप ने परिश्रम घेतले. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतः श्रमदान करून माजी विद्यार्थांच्या ग्रुपने वक्त्यांनी दिलेल्या वडाच्या झाडाचा फक्त स्विकार न करता शाळेच्या आवारात ताबडतोब वृक्षारोपण देखील करून घेतले तसेच या आधी वृक्ष लागवड करून संवर्धन केलेल्या वड, कडुनिंब या वृक्षांना देखील भेटी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहांकडून चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत !

November 14, 2024

शुभ दिनेशजी बरडिया यांचे ९ उपवास संपन्न !

July 9, 2023

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ; शिवसैनिकांनी एकाला चांगलेच चोपले

March 24, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group