चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कोविड केअर सेंटरची पाहणी केली. कोविड सेंटर मधील स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत त्यांनी प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे व वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते. येणाऱ्या काळात आवश्यक असणाऱ्या उपाययोजनाबाबत देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा करत तालुक्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा त्यांनी घेतला.