धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघाळूद खुर्द गावातून अज्ञात व्यक्तीने मोटार सायकल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दिलीप भगवान गायकवाड (रा. चावलखेडे) यांनी मोटार सायकल चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. दि. २८ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दिलीप गायकवाड व त्यांचे मित्र कांतीलाल शांताराम पवार (रा. चावलेखेडे) असे दोघे जण हिरो कंपनीची (एचएफ डिलक्स मो. सायकल क्रमांक एमएच १९/सीएन-४४५९) ही घेऊन वाघळुद खुर्द, ता. धरणगाव गावी सतीमाता देवीची यात्रा पाहण्यासाठी गेले होते. वरिल मोटार सायकल वाघळुद गावातील स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी लाऊन देवीचे दर्शन घेवून तसेच यात्रा बघून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संबंधित मोटर सायकल लावलेल्या ठिकाणी मोटर सायकल दिसली नाही. त्यामुळे दिलीप गायकवाड यांनी आपल्या मित्रासोबत मोटर सायकलचा वाघळुद गावात तसेच आजु-बाजुच्या गावाना जात शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही. त्यामुळे कांतीलाल पवार यांनी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करीत आहेत.