धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कल्याणे खु येथील एका घराच्या बाहेर अंगणात लावलेली मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भगवान सुरेश पाटील (वय ३४, रा. कल्याणे खु ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.०६ मार्च २२ रोजी चे रात्री १० ते दि.०७ मार्च २०२२ रोजीचे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान राहत्या घरा बाहेरून १५ हजार रुपये किंमतीची एक निळे पट्टे असलेली हिरोहोन्डा कंपनीची स्पेल्न्डर प्लस मोटारसायकल (क्र.mh.१९ ah २८२१) ही कोणीतरी चोरुन नेली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दिपक गोकुळ पाटील हे करीत आहेत.