धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी बु. येथील विठ्ठल मंदिराजवळील इंदिरानगरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात विनोद राजेंद्र चौधरी (वय २२ रा. विठ्ठल मंदिर जवळ इंदिरानगर पाळधी बु ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ जून २०२२ रोजी विनोद चौधरी याच्या काकाच्या नावे असलेली बुलेट मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीक्यू १७१४) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहेत.