धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीच्या गेट नं ०३ जवळील मोटारसायकल पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात विशाल विजय पाटील (वय ४६, रा. प्लॉट नं. १ विष्णू नगर अशोक बेकरी जवळ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ मार्च २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीच्या गेट नं ०३ जवळील मोटारसायकल पार्किंग मधून ३० हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल क्रमांक (एम.एच १९ ए ०३३६) चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. फौज नसिम तडवी करीत आहेत.