मुंबई (वृत्तसंस्था) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत जळगावातील विकासाबाबत चर्चा झाली. तसेच यावेळी खासदार संजय राऊत यांना जळगावला येण्याचे आमंत्रणही देण्यात आले.
महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे सध्या मुंबईत असून लवकरच भाजपमधील नगरसेवकांचा एक गट शिवसेनेत दाखल होणार आहे. कालच महापौर आणि उपमहापौर यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत जळगावातील विकासाबाबत चर्चा झाली. तसेच खासदार राऊत यांना जळगाव भेटीचे निमंत्रण देखील देण्यात आले.