चाळीसगाव (प्रतिनिधी) जालना येथील उद्योगपती संजय सिंगारे यांनी संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेली लेखी तक्रार धादांत खोटी व बनावट आहे. वास्तविक या कंपनीशी खासदार उन्मेश पाटील यांचा काहीएक संबंध नाही. मी व प्रमोद जाधव आम्ही श्रीनिवासा प्रोटीन्स प्रा. ली. कंपनीचे संचालक आहोत. वास्तविक संजय सींगारे यांनी या कंपनीत त्यांच्या आधीच्या कंपनीचा अनुभव असल्याने त्यांनी सोयीस्कररित्या परस्पर पैसे काढून घेतल्याची तक्रार मी व प्रमोद जाधव आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रोजी दाखल केलेली आहे. वास्तविक खासदार उन्मेश पाटील यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसतांना चाळीसगाव येथील स्थानिक मोठ्या लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या तोंडावर शिनगारे परिवाराला हाताशी धरून राजकीय षडयंत्र करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत वाघ यांनी केला आहे.
प्रशांत वाघ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, फाजील प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीवर आरोप लावूणे हे स्टंट बाजीचे प्रकार असून लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली असे सर्रास गैरतक्रारी या निवडणुकांच्या पाश्वर्वभूमीवर होता आहेत. याच घाणेरड्या राजकीय उद्देशाने खासदार उन्मेश पाटील यांचे नाव तक्रारीत घेण्यात आले असून यांचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला माहीत आहे. कपंनीचे संचालक प्रशांत वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, संजय शिनगारे परिवाराला त्यांच्या या व्यवसायातला अनुभव असल्याने कंपनीचे सर्व व्यवस्थापन, व्यवहार त्यांच्याकडे दिलेले होते. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून आमची फसवणूक केली आहे. त्यांनी कंपनीच्या खात्यातून परस्पर विविध कंपनीच्या नावाने खोटी बिले सादर करून कंपनीतून पैसे वळते केले. तसेच श्रीनिवासा कंपनीत तयार झालेला माल त्यांच्या बालाजी उद्योग या कंपनीच्या नावाखाली परस्पर विकून ते पैसे स्वतः कडे ठेवून कंपनीची आर्थिक फसवणूक केली.
कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असता ही बाब उघड झाली. या अफरातफरीबाबत आम्ही संचालकांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. बँकेला देखील खोटे स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेचे देखील फसवणूक केली. संबंधित बँकेने त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या त्या नोटिसांना त्यांनी कुठले उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रीतसर तक्रार दिलेली आहे.
शिंनगारे परिवाराने श्रीनिवासा प्रोटीन्स कंपनीतून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे १८ कोटी ५० लाख (साडे अठरा कोटी) रुपये काढून घेतले. याची त्यांनी आम्हाला साक्षांकित लेखी कबुली दिली आहे. उलटपक्षी आमची श्रीनिवासा प्रोटीन्स मध्ये सुमारे ११ कोटी (अकरा कोटी) रुपयाची गुंतवणूक अडकली आहे. वास्तविक बघता शिंगारे परिवाराचे सर्व उद्योगधंदे दिवाळखोरीत निघालेले आले आहेत. व्यापाऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाल्याने अनेक व्यापाऱ्यांची त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे. उलट या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचेही वाघ यांनी म्हटले आहे.