जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सोमवारी पुन्हा एका गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. मुकेश प्रकाश भालेराव (२८ रा. भुसावळ) असे एमपीडीएची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. (Jalgaon Crime News)
पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या १४ दिवसात दोन जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर मुकेश भालेराव विरुद्ध भुसावळ शहर व तालुका पोलिस ठाण्यात ४ खुनाचा प्रयत्न, १ दंगा, १ आत्महत्या प्रयत्न करणे, १ आर्म अॅक्ट असे एकूण ७ गुन्हे दाखल असून, त्यास त्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर जामिनावर सुटताच गुन्हे करीत होता. त्यामुळे भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता.
प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस अधीक्षकांनी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविलेला होता. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मुकेश यास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील व पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी पथक तयार केले. युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, आसिफ खान युसूफ खान, मोहम्मद अली, अनिल चौधरी, संजय पाटील, सुपडा पाटील, विकास बाविस्कर, भूषण चौधरी यांनी सोमवारी मुकेश याला ताब्यात घेत प्रस्ताव नाशिक कारागृहात रवानगी केली.