जळगाव (प्रतिनिधी) फ्युजन ग्रुप यांनी आयोजित केलेल्या मिसेस एशियामध्ये मृणालिनी चित्ते या मिसेस एशिया इंटरनॅशनल 2022 ठरल्या आहेत.
मृणालिनी चित्ते या मिसेस इंडिया देखील राहिल्या आहे. त्यांनी मिसेस एशिया इंटरनॅशनल 2022 चे विजेतेपदही पटकावले आहे. मुणालिनी चित्ते ह्या डॉ.प्रकाश चित्ते (प्रख्यात मनोविकार तज्ञ) यांच्या पत्नी असून त्यांना कौशल (13) व कृतिका (9) ही मुलं आहेत. योगेश मिश्रा, डायरेक्टर, फ्युजन ग्रुप यांनी आयोजित केलेल्या मिसेस एशिया कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश मिश्रा, डॉ अमित सरीन संचालक आरएसटी इव्हेंट्स, राजेश भार्गव आराधना विवाह आणि कार्यक्रम, मंत्री निर्मला सेवानी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ग्रँड ज्युरीमध्ये बॉलीवूड चित्रपट कोरिओग्राफर पप्पू मामाते, मिस ग्रँड इंडिया सिमरन शर्मा, निर्मला सेवानी, इव्हेंट गुरू अर्शद हुसेन होते. मिसेस आशियाचे संयोजक योगेश मिश्रा आणि निमिषा मिश्रा यांनी सांगितले की, ग्रँड फिनालेमध्ये टॉप 10 मॉडेल्सनी रॅम्पवर पहिल्या फेरीत राष्ट्रीय पोशाखाचे प्रदर्शन केले. तर पुढच्या फेरीत ब्रायडल कलेक्शनसोबतच मॉडेल्सनी अतिशय सुंदर गाऊन सादर करणार आहेत.