TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका !

राज्यातील ६ वीजमीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दि. १ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला होता. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडलामधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडलामधील सुप्रीम पॉवर सर्व्हीसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडलामधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलामधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडलामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरू असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या महसुली नुकसानीसोबतच वीजग्राहकांनादेखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांभीर्याने दखल घेत याआधीच दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांच्या समस्या गतिमानतेने निकाली काढा : संचालक डॉ. नरेश गिते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४४ कोरोनाबाधित, १४२ झाले बरे !

June 25, 2021

Gold price Today : सोन्याच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या.. आजचा दर

January 4, 2022

वृद्धाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू !

August 7, 2023

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group