जळगाव (प्रतिनिधी) गुटख्याची तस्करी करणारे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र फोन पे वर ९६ हजार रुपये घेवून वाहन सोडून देणाऱ्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. याबाबतचे आदेश गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजून गेली आहे.
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरमार्गेसंपुण् जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतुक केली जाते. दरम्यान, (एमएच ०२, बीएम ८४२५) क्रमांकाच्या चारचाकी वाहतून भुसावळ येथे गुटखा वाहतुक करणारे वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांनी पैसे घेवून वाहन सोडून दिले होते. तेच वाहन मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थांबवले. त्या संशयास्परित्या जाणाऱ्या वाहनातून गुटखा तस्करी होत आढळून आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ते वाहन पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयात आणली. त्या वाहनातून सुमारे ४ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख (रा. खडका रोड, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कसुरी अहवालावरुन केले निलंबन
आमदारांनी केलेल्या तक्रारीची पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मुक्ताईनगर विभागाचे पोलीस उपअधीक्षकांनी चौकशी करुन त्या पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांचा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. त्या कसुरी अहवालावरुन त्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
फैजपूर उपअधीक्षकांकडे प्राथमिक चौकशी !
आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ गजानन महाजन, पोकॉ डिंगबर कोळी, निखिल नारखेडे, सुरेश पाटील यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच त्यांची प्राथमिक चौकशीचे आदेश फौजपुर पोलीस उपअधीक्षकांकडे यांना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजून गेली होती.
वाहन सोडण्यासाठी घेतले ९६ हजार रुपये !
पैसे घेवून सोडून दिलेल्या गुटख्याच्या वाहनावर आ. चंद्रकांत पाटील यांनी पकडले. त्या वाहन चालकाची चौकशयी केली असता, त्याने मुक्ताईनगर पोलीसांनी वाहन सोडण्यासाठी फोन पे वर ९६ हजार रुपये घेतल्याचे आमदारांना सांगितले. त्यामुळे आमदारांनी पैसे घेवून वाहन सोडून दिल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबतची तक्रार आ. चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती.