जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री ११ वाजता नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदलीमागे त्यांचे आक्षेपार्ह वक्तव्य कारणीभूत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाला वादाला किनार मुक्ताईनगर महिलेचा खून प्रकरणाचा खरा तपास कोणी केला?, हे असल्याचे कळते.
‘द क्लिअर न्यूज’ने मलकापूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी महिला प्रभा माधव फाळके यांच्या खुनाचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने यशस्वी उलगडा केला, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. याच बातमीच्या विषयावरून संभाषणात आक्षेपार्ह वक्तव्य बोलले गेल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण हे आज नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना भेटून याबाबत संपूर्ण माहिती देणार असून कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे कळते.
मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट रोजी फेकलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मारेकरी, मयत महिला, खून झाल्याचे घटनास्थळ हे सर्व मुक्ताईनगर बाहेरील असल्यानंतरही पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने या खुनाचा उलगडा केला होता. परंतू या खुनाचा तपास एलसीबीने केला होता, असा दावा संबंधिताचा होता. याच बाबत फोनवर कर्मचाऱ्यासोबत बोलताना आक्षेपार्ह संभाषण झाल्याचे कळतेय.
मुक्ताईनगरची ती बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा