जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे ६ उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे ६ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. परंतु औपचारी घोषणा ही मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. मनपाच्या निवडणुकीसाठी छाननी झाल्यानंतर ६९६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर दोन दिवस माघारीची मुदत होती. दि.२ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक उमेदवारांनी माघार घेतली.
प्रभाग क्रमांक १८ अ मधून शिवसेना शिंदे गटाचे गौरव चंद्रकांत सोनवणे, प्रभाग क्र २ सागर शामकांत सोनवणे, प्रभाग क्र १९ अ मधून रेखा चुडामन पाटील, प्रभाग क्र१९ व मधुन गणेश उर्फ विक्रम किसन सोनवणे, प्रभाग क्रमांक ९ व मधून प्रतिभा गजानन देशमुख, प्रभाग क्र ९ अ मधून मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, भाजपाकडून प्रभाग १२ ‘ब’ मधून उज्वला बेंडाळे, प्रभाग ७ अ मधून दीपमाला काळे, प्रभाग क्रमांक विश्वनाथ उर्फ विरेंद्र खडके, प्रभाग क्रमांक ७ ‘ब’ अंकिता पंकज पाटील, प्रभाग ७ ‘क’ विशाल सुरेश भोळे, प्रभाग क्र १३ क वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधून दोन, सात मधून तीन बिनविरोध
प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधुन प्रतिभा गजानन देशमुख, प्रभाग क्र ९ ‘अ’ मधून मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे तर. प्रभाग क्रमांक सात मधून प्रभाग ७ अ मधून दीपमाला काळे, प्रभाग क्रमांक विश्वनाथ उर्फ विरेंद्र खडके, प्रभाग क्रमांक ७ ‘ब’ अंकिता पंकज पाटील, प्रभाग ७’क’ विशाल सुरेश भोळे हे बिनविरोध झाले आहेत.
मुलासाठी माजी महापौरांची माघार
आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व माजी महापौर सिमा भोळे यांनी प्रभाग क्रमांक सात मधून माघार घेतली आहे. आपला मुलगा विशाल सुरेश भोळे यांनी ही माघार घेतली असून त्यांच्या माघारीमुळे भाजपाच्या दिपमाला काळे ह्या देखील बिनविरोध झाल्या आहेत.
रेखा चुडामन विरोधात तुतारीची माघार
प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा चुडामन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सरला सुनिल सोनवणे यांच्यासह अपक्ष उमेदवार सुजाता सतिष चौधरी व पुजा गणेश पाटील यांनी माघार घेतल्यामुळे रेखा पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
आ. राजुमामा भोळेचा मुलगा, मेहूणा बिनविरोध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तेथील स्थानिक आमदारांच्या नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत आ. सुरेश भोळे यांचा मुलगा विशाल सुरेश भोळे व त्यांचा मेहूणा विश्वनाथ उर्फ विरेद्र खडके यांना तिकीट देण्यात आले. तसेच त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी आ. भोळे यांनी सर्वपरीने प्रयत्न केले असल्याचे दिसन येत आहे















