जळगाव (प्रतिनिधी) एका ४० वर्षीय तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना तालुक्यातील सावखेडा शिवारात उघडकीस आली आहे. दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील सावखेडा शिवारात एका ४० वर्षीय तरुणाचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून घटनास्थळी सहायक पोलीस उपाध्यक्ष कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. त्यानंतर मृत्यूदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.