भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित मुकेश भालेराव याची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय असून काही संशयितांना पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयीत मृत मुकेश प्रकाश भालेराव (वय 32, टेक्निकल हायस्कूलमागे, भुसावळ) विरोधात अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे तर मध्यंतरी त्यास स्थानबद्ध देखील करण्यात आले. शिवाय हद्दपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली होती. दरम्यान मुकेश भालेराव याची हत्या करून मृतदेह दफन केल्याची घटना आज शुक्रवार रोजी घडली आहे. खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला
 
	    	
 
















