TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधी येथे शुभारंभ

कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांची साथ महत्वाची - पालकमंत्री गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागातून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ महत्वाची आहे. या लढाईत नागरीकांनी प्रशासनास साथ देऊन दिलेल्या सुचनांचे पालन केले तर कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेची सुरुवात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील या होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तहसीलदार नितिनकुमार देवरे, सरपंच अलकाबाई प्रकाश पाटील, आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महसुल व आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 25 नोव्हेंबर 2026 !

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आवश्यक

कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हा या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वसंरक्षण) भर देणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता आदीबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जिल्हाभर जनजागृती करावी. जिल्हा प्रशासनाने संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्तींच्या शोध घ्यावा. लवकरच नवरात्रीचा उत्सव येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

नागरीकांनी भिती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी

माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम आजपासून 24 ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या बाबतीत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु नागरीकांनी भिती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन आपली व आपल्या कुटूंबाची तपासणी करुन घेतली पाहिजे, जेणेकरुन आपण कोरोनाची साखळी लवकरात लवकर तोडू शकतो. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक कार्यकर्तांचा सहभाग महत्वाचा आहे. यंत्रणेच्या कामाला सामाजिक संघटनांची जोड मिळाली तर आपला जळगाव जिल्हा लवकरच निरोगी जिल्हा होण्यास मदत होईल. तरी नागरीकांनी आपल्या घरी भेट देणा-या पथकांना सहकार्य करुन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपुर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासुन बचाव करावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोडे म्हणाले की, या मोहीमेअंतर्गत आरोग्य विभागाचा एक कर्मचारी व दोन स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा. या तपासणीत मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेऊन आवश्यकता भासल्यास त्यांची तपासणी व उपचारही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर तपासणी पथकासोबत नागरीकांच्या घरी जाऊन या मोहिमेत सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 25 नोव्हेंबर 2026 !

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
कोर्ट

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

November 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2026!

November 24, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत !

October 24, 2023

विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

January 9, 2024

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस; दर महिन्याला ८५० टन लसीचे डोस पुरवले जाणार

December 21, 2020

जळगाव : दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव !

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group