जळगाव (प्रतिनिधी) माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत कानळदा तालुका जळगाव येथे घरोघरी जाऊन सर्दी, खोकला, ताप तसेच बीपी, शुगर, इ. आजार असलेले रुग्ण शोधले जात आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याविषयी आवाहन व जनजागृती केली जात आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून या मोहिमेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानळदा बॉईज येथील उपशिक्षिका छाया अजय पाटील यांच्यासमवेत अंगणवाडी सेविका मंदाकिनी सरोदे आणि आशा स्वयंसेविका ललिता भंगाळे व अर्चना राणे सर्वेक्षण करीत आहेत. पर्यवेक्षण आदर्श हायस्कूल कानळदा येथील एस. डी. मोरे करत आहेत.