पुणे (वृत्तसंस्था) अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनाथांचा आधार तसेच हजारो लेकरांची माय अशी सिंधुताई सपकाळ यांची ओळख आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. त्याआधी त्यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरी येथे नेले जाणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते ११ पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.
दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी अंत्यसंस्कार
अंत्यदर्शनाची वेळ संपल्यानंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल.