धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी खुर्द येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाजारातून दोनगाव येथील रहिवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरला होता. धरणगाव पोलिसांनी तपासचक्र फिरवीत अवघ्या पाच तासात मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या संदर्भात अधिक असे की, पाळधी खुर्द येथील बाजारात शालिक युवराज बिराडे (रा. दोनगाव) यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेला होता. याप्रकरणी श्री.बिराडे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशन ला भाग-५ गुन्हा रजिस्टर क्र.२१८/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५ तासात आरोपी मानक जयवंत राठोड (रा. नेर, नेपानगर, ह. मु. एरंडोल बस स्टँडच्या मागे) याला दि. ७ नोव्हेंबर रोजी ०१.३९ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ८ हजार रुपये किंमतीचा ओप्पो ए सेवन कंपनीचा मोबाईल पंचासमक्ष काढून दिला आहे. सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांचा चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस स्थानकात सत्कार केला. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गायकवाड तसेच तपासी अंमलदार तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन व टीम केले.
माझा मोबाईल चोरला गेला तेव्हा जळगाव cyber crime (mr.Badgujar ) यांनी का दुर्लक्ष केले.