मुंबई (वृत्तसंस्था) एका व्यक्तीने नागाला मारलं. त्याचा बदला घेण्यासाठी नागिन या व्यक्तीला ७ वेळा चावली. परंतु या सगळ्यात ज्या व्यक्तीला हा नागिन चावली तो व्यक्ती सातही वेळेला वाचल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधल्या मपूरमध्ये घडली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
या संदर्भात अधिक असे की, रामपूर जिल्ह्यातील मिर्झापूर गावात राहणारा एहसान उर्फ बबलू हा शेतात मजुरी करतो. सात महिन्यांपूर्वी त्याला नाग आणि नागिनीची जोडी आढळून आली. यातल्या नागाला त्याने मारलं पण यात नागिन वाचली. यानंतर नागिनीने आपल्या नागाच्या हत्येचा बदला घेतला. नागिन बबलूला एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली. सुदैवाने बबलू सातही वेळा वाचला. बबलू या सगळ्या प्रकाराविषयी म्हणतो, मी खूप गरीब आहे आणि मजूर म्हणून सत्येंद्र यांच्या शेतात काम करतो. ७ महिन्यांपूर्वी मला नाग आणि नागिन दिसले. मी त्यातल्या नागाला मारलं. तेव्हापासून मला नागिनीने अनेकदा नागाने दंश केला आहे. आतापर्यंत सातवेळा ही नागिन मला चावली आहे. मला चार लहान मुलं आहेत. मला सतत भिती वाटत राहाते की माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय होईल. नाग आणि बबलू यांच्या या लढाईची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.