TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तामिळनाडूचं भविष्य नागपुरचे ‘निकरवाले’ कधीच ठरवू शकत नाही : राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चेन्नई (वृत्तसंस्था) “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही.. त्यांना हे समजत नाही की तामिळनाडूचं भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत.” असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भर सभेतून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. जनतेला संबोधित करताना त्यांनी विविध मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निकरवाले नाही तर तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर तुफान हल्लाबोल केलाय. ‘तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल’, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने ज्या प्रकारे भारताचं अध:पतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताना पायाच नष्ट करायचाय. आपण सगळे मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढू’, अशी साद राहुल गांधींनी यावेळी जनतेला घातली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी… मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली ‘मन की बात सांगण्यासाठी…’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या ‘मन की बात’वर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत या विषयावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याऐवजी सरकार त्यांना दहशतवादी ठरवून मोकळं होत आहे. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

“महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जळगावात गुरुनानक नगरात दोन गटात हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयजींच्या पथकाची बायो डिझेल पंपावर धाड ; १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत !

September 6, 2023

आई-वडिलांना विसरू नका; तुमच्यामुळे त्यांचं नाव उजळलं पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 19, 2025

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन सन्मान

January 9, 2022

एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

February 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group