धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव वि.का.सोसायटी माजी संचालक तथा गौतम गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष नारायण गोविंद वाघमारे (वय ९२) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी राहते घर नवे गाव येथून निघणार आहे.
कालकथित नारायण गोविंद वाघमारे यांच्या पश्चात तीन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते नेव्हीचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल वाघमारे, दीपक वाघमारे यांचे वडील होत. तर माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांचे काका होते.