नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमधील पंचवटी परिसरात (Panchvati area of Nashik) वडिलांनीच आपल्या मुलाची गळा दाबून हत्या केली आणि हत्या केल्यानंतर बापानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अस वडील-मुलाचे नाव आहे.
आज सकाळी मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहत्या घरी वडील आणि मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हंटले जात होते. परंतु आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या घटनेत मुलाचा खून करून बापाने आत्महत्या केली आहे. वडिलांकडून मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मुलाचीच हत्या केल्यानंतर बापानेही आत्महत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन वडिलांनी आत्महत्या केली आहे. तर या हत्या आणि आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांचा मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. नाशिक पोलीस पुढील तपास करत आहेत.