चोपडा दि.२०(प्रतिनिधी)- येथील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिन २०२५ निमित्ताने ‘राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार’ संस्थेचे अध्यक्ष डॅा.महेंद्र देशपांडे यांनी घोषीत केला आहे.नेवे यांनी पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दि.५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.