जळगाव ( प्रतिनिधी ) – आर आर विद्यालयात आज दि. 28/02/2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक संजय पिले होते. व्यासपीठावर जेष्ठ शिक्षिका पी एस याज्ञिक, विज्ञान प्रमुख एस डी पाटील, वाय जी चौधरी, गिरीष भावसार जे एम पाटिल, ए एन पाटील, एम एन खडसे, पी आर श्रावगी, वाय एच बडगुजर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस डी पाटील यांनी केले. नेहा पाटील, पूर्वा तायडे, मयूर जाधव या विद्यार्थ्यांनी डॉ. सी व्ही रमण यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात संजय पिले यांनी आपल्या मनोगतात डॉ. सी व्ही रमण यांच्या विज्ञानातील योगदानाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती फेगडे व तृष्णाली चौधरी या विद्यार्थिनींनी केले तर आभार वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनीने मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक मॉडेल्सचे प्रदर्शन भरवण्यात आले तसेच विद्यार्थिनींनी काढलेल्या विज्ञान विषयक रांगोळ्यांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
















