TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले आहे.

या स्पर्धेत दोन वेगवेगळया भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करुन स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट You-Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने http:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह २० जुलै, २०२१ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

स्पर्धेसाठी भाग एक करीता हागणदारीमुक्त लघुपट निर्मिती करावयाची असून यासाठी जैव-विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक १ लाख ६० हजार रुपये, व्दितीय पारितोषिक ६० हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. भाग दोनसाठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मितीचे करावयाची आहे. यासाठी विषय- वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र हे देण्यात आले आहेत. याकरीता प्रथम पारितोषिक २ लाख रुपये, व्दितीय पारितोषिक १ लाख २० हजार रुपये, तृतीय पारितोषिक ८० हजार रुपये असे असणार आहे. प्रत्येक क्षेत्राकरिता प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सहभागासाठी मार्गदर्शक सूचना

केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी, सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील सहभाग घेऊ शकतात. लघुपटांचा कालावधी कमीत कमी १ ते ५ मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्विकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम व अटींच्या अधीन राहून आवेदन व अर्ज सादर करावेत. सदर लघुपटनिर्मिती स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले आहे.

अधिक माहितीकरिता https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/ या लिंक पहावी, असेही लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
जळगाव

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

March 8, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन सुरु ; जालन्यात राजेश टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

September 17, 2020

चाळीसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका प्रमुखांकडून सन्मान

January 19, 2021

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025

महानगरपालिका प्रशासनाची कडक कारवाई ; थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या जप्त !

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group