नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब काँग्रेस नेते अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Punjab Congress leader Navjyot Singh Sidhu) यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलीस ताब्यात घेणार आहेत. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूंना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे
काय आहे प्रकरण?
पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.