धरणगाव (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे दर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत आहेत. या वाढत्या महागाईचा धरणगाव राष्ट्रवादीने निषेध व्यक्त करत धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, तालुका कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, विद्यार्थी उपाध्यक्ष वासुदेव सपकाळे, दिनेश पाटील, भुषण पाटील, अमर चव्हाण, प्रेमचंद चव्हाण, श्रीकांत साळुंखे आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.