जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिलीय.
यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेकांनी पदे घेतली आहेत. मात्र त्या पदाचा ते ‘शो पीस’ प्रमाणे वापर करतात. मात्र, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना ते हजर राहत नाहीत. पक्षाचे कार्यक्रम, बैठकांना अगदी मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतात. त्यांना ही पदे दिलेली असल्याने नवीन कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. पक्षाचे कार्य न करणारे आणि केवळ शो पीस म्हणून पदाचा वापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नवीन लोकांना संधी देण्याचा उद्देशाने आपण ही कार्यकारिणी बरखास्त केली आहे. याबाबत आपण पक्षाचे निरीक्षक अविनाश आदिक यांच्याशी चर्चा केली आहे. नवीन कार्यकारिणी आपण चार ते पाच दिवसांत वरिष्ठांशी चर्चा करून जाहीर करणार आहोत, असेही शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले.