TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कोविड-१९’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात !

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ‘कोविड-१९’ मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची (Task Force) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त् सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते तर पोलीस निरिक्षक बापू रोहोम, जिल्हा बालकल्याण समितीच्या वैजयंती तळेले व इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले हेाते.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांचा विषय संवेदनशील आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड-१९’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच ‘कोविड-१९’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत.

‘कोविड-१९’ मुळे पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सहकार्य करावे. अशा बालकांच्या संपर्कात राहत त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल याची दक्षता घ्यावी. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना पात्रतेचे निकष तपासून शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ मिळवून द्यावा शिवाय त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी. जी बालके नातेवाईकांकडे राहत असतील त्यांचा नियमानुसार सांभाळ करण्याबाबत सुचना देणे, दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणे, पालकांचे शिक्षण व इतर बाबींसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.
जिल्ह्यात सध्या दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ९ असून यापैकी ७ बालके हे १८ वर्षाच्या आतील तर २ बालके १८ वर्षावरील आहेत. तर एक पालक मृत्यु पावलेल्या बालकांची संख्या १९१ इतकी असून त्यापैकी १३४ बालके हे १८ वर्षाच्या आतील, ५२ बालके १८ वर्षावरील तर ५ बालके हे एक वर्षाखालील आहेत. जळगाव महानगरपालिकेकडून कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या ३१९ पालकांची यादी प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरु आहे. दवाखान्यात दाखल असलेल्या पालकांची संख्या ११ असून कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांची संख्या १५३ इतकी असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी परदेशी यांनी बैठकीत सांगितले.

बालकांसाठी हेल्पलाइन

कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ज्या बालकांचे पालक मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रूग्णालयात दाखल असल्याने त्यांची काळजी व संरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊन त्यांची देखभाल होऊ शकत नाही. अशा संकटामध्ये सापडलेली बालके आढळून आल्यास अथवा माहिती मिळाल्यास त्याची माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098, बालगृह 7378490960/9420389115, अध्यक्ष, बालकल्याण समिती 7588010036, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 9423954912, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी 8308177811, जिल्हा बाल संरक्षण कक्ष मदत केंद्र 8007986557/7249118161, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय 0257-2228828, जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालय 0257-2228825 वर द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी परदेशी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

केळी पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाच्या मार्गदर्शक सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या पराभवासाठी भाजप रचतेय सापळा ; महाजन लागलेत कामाला !

June 17, 2022

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन !

April 11, 2021

धरणगाव : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील ५ आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी !

January 20, 2021

कोरोना काळात गरजूंना मदत करणारा रिअल सुपरहिरो सोनू सूदला कोरोनाची लागण

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group