धरणगाव (प्रतिनिधी) बालकवी ठोबरे व सराजाई कुडे विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापक एस पाटील सर जीवन पाटील सर यांनीभूषविले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष विनोद रोकडे, हेमांगी अग्निहोत्री इंदूबाई बडगुजर अशारफ शेख होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा शाळेच्या पटांगणवर पार पडला. मुक्तांगण क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित विद्यालयाच्या मुख्याध्यापक एस एस पाटील सर, जीवन पाटील सर, क्रीडा शिक्षक कैलास माळी सर सचिन सूर्यवंशी सर वारुळे मॅडम धरणगाव पत्रकार अधिकृत संघाचे शहर अध्यक्ष विनोद रोकडे, पालक सभेचे हेमांगी अग्निहोत्री, अशरफ शेख, इंदूबाई बडगुजर यांनी दीपप्रज्वलनाने मुक्तांगण क्रीडा महोत्सवचे उदघाटन केले.
यानंतर कार्यक्रमांमध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लंगडी कबड्डी खो-खो , रिले रेस हॉलीबॉल , बेडूक उड्या , बुद्धिबळ क्रिकेट बॅडमिंटन याप्रमाणे अनेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वर्ग नर्सरी ते दहावी च्या विविध विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.