धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव येथील भारती रविंद्र पाटील हीने ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रॅक मिळवित एमपीएससीच्या परिक्षेत यश मिळवले आहे. भारतीला वर्ग १ मध्ये दुय्यम निबंधक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीने यश मिळविले ते देखील सेल्फ स्टडी करून, त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घरीच अभ्यासाची स्वतंत्र खोली केली तयार !
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात भारती रविंद्र पाटील हीचा जन्म झाला. गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर भारतीने बीएससी मॅथमॅटीक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ पासून आपल्या उराशी बाळगलेले प्रशासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली. सहा महिने क्लास लावून अभ्यासाची पद्धत जाणून घेतली, मात्र त्यानंतर भारती होने घरीच अभ्यासाची स्वतंत्र खोली तयार करुन घेत सेल्फस्टडीला सुरुवात केली.
ओबीसी प्रवर्गातून मिळवली तिसरी रँक !
२०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परिक्षेच्या पुर्वपरिक्षेत ‘भारतीला अपयश आले. मात्र ती खचून न जाता तीच्या कुटुंबियांनी दिलेल्या आधारावर पुन्हा दिवसरात्र अभ्यास सुरु ठेवला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षा पास झाल्यानंतर मुख्य परिक्षेची तारीख जाहीर होत नव्हती. परंतू अशा परिस्थिीत खचून न जाता ‘भारती हीने मुख्य परिक्षेच्या केवळ ४० ते ५० दिवस अगोदर अभ्यास करीत ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रैंक मिळवीत यशाचे शिखर गाठले. यशात आई, वडीलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा वडील उच्चशिक्षीत शेतकरी रविंद्र पाटील असून ते राजकारणात देखील सक्रीय आहेत.
आई-वडील पाठीशी खंबीरपणे राहिले उभे !
अभ्यासक्रमात असलेल्या कायदेविषयक क्लिष्ट अभ्यासक्रमाविषयी श्रेयस बढे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच अपयश आल्यानंतर देखील पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आई, वडीलांसह अभ्यास करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लहान भावाचा देखील मोलाचा वाटा असल्याची भावना भारती पाटील यांनी व्यक्त केली.
तिसऱ्या प्रयत्नात उमटवली यशाची मोहर !
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असतांना भारती पाटील यांना अनेक अडचणी आल्या. परंतू त्यांनी अडवणींवर मात करीत दिवसभरातील पाच ते सहा तास अभ्यास हा त्यांचा नित्यक्रम झाला होता, सोशल मीडियाचा देखील त्यांना अभ्यासात मोठा फायदा झाला असून अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी एमपीएसी परिक्षेत यश संपादन करीत दुय्यम निबंधक पदावर आपल्या यशाची मोहर उमटवली.
दोन वेळा सोडली पीएसआयची नोकरी !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये जाहीरात काढण्यात आली. परंतू ही परिक्षा पोस्टपॉण्ड झाल्याने २०२२ मध्ये पीएसआय पदासाठी परिक्षा दिली. यामध्ये देखील भारती हीचा स्कोअर चांगला होता, मात्र तीला पीएसपदासाठी इच्छुक नसल्याने तीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. भारती पाटील हीचा अभ्यास सुरु असतांना तीचे दोन वेळेच पीएसआयच्या परिक्षेत्र यश संपादन केले असल्याचे तीने सांगितले.