नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकाराने टूरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरटर्सना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर ३० दिवसांमध्ये परमिट मिळेल अशी माहिती दिली आहे. हा नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहे.
तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो. हा नियम संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर आणि फीस भरल्यानंतर जारी केला जाईल. यासाठीची कागदपत्र जमा करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेश अँड परमिट रुल्स २०२१ रुपात ओळखला जाईल. परिवहन मंत्रालयानुसार, या स्किममध्ये टूरिस्ट व्हिकल ऑपरेटर्सला वेळेची फ्लेक्सिबिलिटी मिळेल. याअंतर्गत ऑपरेटरला तीन महिन्याचं परमिट मिळेल. अधिकाधिक 3 वर्षांपर्यंत परमिट दिलं जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात देशातील पर्यटनातील वाढीच्या दृष्टीने मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.