जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथे प्रेम विवाह केलेल्या नव दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आज दोन्ही गटातील ३ आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
यासंदर्भा अधिक असे की, घरून पळून जाऊन मंदिरात लग्न केलेल्या तरुणीचा ३१ डिसेंबरच्या रात्री पाळधी येथे सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. तर एकादिवसानंतर तिच्या पतीचा देखील उपचारादरम्यान, मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकाविरुद्ध फिर्याद दिली होती. याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार मुलीकडील विजय भोसले जामीन यांचा १५ हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. आरोपीकडून अॅड. सतीश पाटील यांनी काम पहिले. दुसरीकडे मुलाकडील विजय बोरसे, विकास धर्मा कोळी यांचा देखील जामीन मंजूर १५ हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला तर विजयसिंग पाटील, कविता पाटील या दोघांच्या जामीन अर्जावर १५ तारखेला सुनवाई होणार आहे. आरोपीकडून अॅड.मनोज दवे, अॅड. शैलेश पाटील यांनी काम पहिले. न्या. पी.वाय.लाडेकर जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात सुनवाई सुरु आहे.















