पुणे (वृत्तसंस्था) : पीएफआय ही अत्यंत वादग्रस्त संस्था आहे. या संस्थेचं पुण्यात व पुणे जिल्ह्यामध्ये हब असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी जमियत उलेमा ए हिंदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट दिला आहे.
अतिशय कट्टरतावादी गट असून तो हळूहळू देशात सक्रिय होत आहे. केवळ एका राज्यात नव्हे तर अनेक राज्यात याची हा गट सक्रिय होत असल्याच्या संशयातून NIA कारवाई सुरू केली आहे. देशात जवळपास 50 ठिकाणी तर राज्यात 20 ठिकाणी छापेमारी केली आहे.
पुण्यात PFI आपल्या हालचालींचे केंद्र तयार होत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे. एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आज ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. महाराष्ट्रातून एकूण 20 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून सचिवाला अटक करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले.
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केरळ, तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India PFI) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीनं या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली आहे. या कारवाईत तपास यंत्रणेनं आणखी 100 जणांना अटक केली आहे.
NIA ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, ज्याअंतर्गत पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणं, प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणं यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे.